आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 19, 2022
Spread the love

दुभाजकाला धडकून ट्रक झाला पलटी : नवले ब्रिज परिसर चालकासह बनलाय मृत्यूचा सापळा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आंबेगाव बुद्रुक – नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा हॉटस्पॉट ठरला असून, गुरुवारी रात्री आणखी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज बाह्य वळण मार्गावरील नवले ब्रिजकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.

अशोक लेलँड शोरूम समोर भरधाव ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ट्रक चालकासह एकजण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महेंद्र चौधरी राजावर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रंजन कुमार मंडल असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चालक जसवंत उराव (रा. सुस, पाषाण) याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, भरधाव ट्रक हा नवले ब्रिजकडून कात्रजच्या दिशेने जात होता. अशोक लेलँड समोर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातानंतर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

get_footer();