आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजा बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 22, 2022
Spread the love

कोथरूड पोलिसांची कारवाई : ३० किलो गांजा जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गांजा बाळगणाऱ्या दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून ३० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

मेहबूब पठाण अब्दुल हई (वय ५०, रा. बीट चाळ नं.२०, भायखळा, मुंबई) आणि दीपक राजाराम धनगर (वय ५२, रा. इंडियन ऑईल, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

कोथरूडमधील फ्युचर सोसायटीजवळील ब्रिजखाली मोठ्या प्रमाणावर गांजा बाळगून दोघे थांबले असून, ते गांजा घेऊन मुंबईला जाणार असल्याची माहिती कोथरूड पोलीस स्टेशनमधील तपास पथकातील अंमलदारांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थली धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून ३० किलो गांजा जप्त केला असून, दोघांवर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक सागर सावळे, पोलीस नाईक आदिनाथ चौधर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();