आवृत्ती पुणे

भरदिवसा घरफोडी करणा-या विधी संघर्षग्रस्त बालकास मुद्देमालासह अटक

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी : सोन्याच्या दोन अंगठ्यांसह सव्वालाख रूपये हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज : पुणे :  कात्रज येथील संतोष नगर परिसरात घरफोडी करून रोख रक्कमेसह सोन्याच्या अंगठ्या चोरून पसार झालेल्या विधीसंघर्षीत बालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ४८ तासात अटक केली. त्याच्याकडील मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत केली. पंधरा ऑगस्ट  रोजी दुपारनंतर अन्वर सत्तार मोमीन  (वय ४६, … Read more

गुन्ह्यातील जप्त पाच वाहनांचा शुक्रवारी होणार लिलाव

मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात कार्यवाही : चार ट्रक व एका टेंपोचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली वाहने अनेक वर्षे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यातील चार ट्रक व एका टेंपोचा लिलाव करण्यासंबंधीची सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मार्केटयार्ड … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई : पिस्टलसह जिवंत काडसुतं जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगार प्रतिबंधात्मक कारवाईच्या उद्देशाने गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगार मयुर अरविंद चव्हाण (वय २३ वर्षे रा. लमाणवाडी, बालाजी हाईटस, खडकवासला) याच्या तपासात त्याच्या जवळ असलेले गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे जप्त केले. … Read more

सव्वा तीन लाखांचे अमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगीरी : परराज्यातील तीघांना केले जेरबंद महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : अंमली पदार्थांचा बेकायदेशीर साठा करून त्याची विक्रि होत असलेल्या वडाची वाडी येथील एका सोसायटीतील सदनिकेत छापा टाकून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ पथकाने परराज्यातील तीघांकडून सव्वा तीन लाख किंमतीचे गाजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले.परराज्यातून येवून … Read more

अवघ्या दोन तासांत हरवलेले मंगळसूत्र परत

सव्वा लाख रुपयांचा दागिना : सहकारनगर पोलिसांच्या सतर्कतेपणाचे कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडी परिसरात हरवलेले मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधून देण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले. धनकवडी येथील प्राची महेश कांबळे यांचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हरवले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी … Read more

पिस्टल बाळगून दहशत माजवणार्याच्या आवळल्या मुसक्या

युनिट सहाची कामगिरी : मयूर गायकवाड व ओंकार नाळे पोलीसांच्या जाळ्यात महाराष्ट्र 360 न्युज पुणे : दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल व जिवंत काडतुसं जवळ बाळगणा-या सराईतांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले. दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व काडतुस बरोबर बाळगणा-या मनोज साळवे टोळीतील मयुर गायकवाड व ओंकार नाळे हे सुयोगनगर ४ … Read more

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more

खुनाची सुपारी घेणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात

वेळीच ताब्यात घेतल्याने वाचले एकाचे प्राण : जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोघांचे कृत्य पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क येरवडा जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोन आरोपींनी एकाच्या खुनाची सुपारी घेतली. मात्र खून करण्याआधीच कोंढवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने एकाचे प्राण वाचले आहेत. आरोपींकडून तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत … Read more

गुजरवाडीतील बैलगाडी शर्यतप्रकरणी
बारा आरोपींना केले गजाआड

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : बंदीच्या आदेशाचा भंग करून शर्यतीचे आयोजन पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा भंग करून गुजरवाडीत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा जणांना गजाआड केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही पुणे शहरातील गुजरवाडीत, उच्च न्यायालयासह राज्य सरकारने … Read more

बिबवेवाडी पोलिस स्टेशनला कलर प्रिंटर भेट

पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क नगरसेविका रूपाली दिनेश धाडवे यांच्या प्रयत्नातून बिबवेवाडी पोलिस स्टेशनला शुक्रवारी (16 जुलै रोजी) कलर प्रिंटर भेट देण्यात आला. या वेळी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह नगरसेवक दिनेश धाडवे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झांवरे आणि पोलिस कर्मचारी सोराटे, रूकवते आदी उपस्थित होते.