आवृत्ती पुणे

विधिसंघर्षित दुचाकीचोर दुचाकीसह ताब्यात

समर्थ पोलिसांची कामगिरी : मौजमजेसाठी केली वाहनचोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या विधिसंघर्षित बालकास दुचाकीसह ताब्यात घेण्यात समर्थ पोलिसांना यश मिळाले असून, सदरची गाडी दाखल गुन्ह्यात जप्त केली आहे. पुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव साजरा होत असताना, नागरिक शहरामध्ये खरेदीसाठी दुचाकीवरून येतात व रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्क करून आपली खरेदीची कामे … Read more

बोराडेनगर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल

वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्तांचे आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशाने बोराडेनगर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांच्या आदेशानुसार आता बोराडेनगर येथील कमेला चौक ते कुमार गुलमोहर सोसायटी मेन गेटपर्यंत रोडच्या पूर्व बाजूस पूर्ण पार्किंग … Read more

त्या दोघांनी बाळाचे बरे वाईट केल्याची शक्यता

मुंढवा पोलिसांनी केले दोघांना जेरबंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून दोन वर्षापूर्वी जन्म दिलेल्या मुलाचे बरेवाईट केल्याचा संशय तरुणीने व्यक्त केला असून, मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शुभम महेश भांडे (वय २३, रा. वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे (वय २६, रा. मारुती निवास, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट रोड, मांजरी) अशी अटक केलेल्यांची … Read more

व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ

कोथरूड-भुसारी कॉलनीतील घटना : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दिवसभरात जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. व्यावसायिकाने बॅग देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना पुण्यातील कोथरुड परिसरातील भुसारी कॉलनी रोडवरील व्हेंच्युरा बिल्डिंगमधील अ‍ॅक्सिस बँकेच्या सिडीएम … Read more

शेतकऱ्यांना २३ कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : पुणे, सोलापूर-रायगडमधील सुमारे ५०० शेतकऱ्यांची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : औषधी वनस्पती शेतात लागवड केल्यानंतर त्याचे उत्पादन विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील पाचशेंपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तब्बल 23 कोटी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली … Read more

तणावमुक्त जीवनासाठी व्यायाम व ध्यानधारणा महत्त्वाची

डॉ. दत्ता कोहिनकर : लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीमुळे पोलिसांवर दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाची समस्या दिसून येत आहे. ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी दररोज व्यायाम आणि ध्यानधारणा करण्याची गरज आहे, असे मत माइंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले. लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने कामातील ताणतणाव कसा दूर … Read more

सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेत पुणे पोलीस आयुक्तालयास प्रथम क्रमांक

महासंचालक कार्यालयच्या स्पर्धेचा निकाल जाहीर : २४ घटकांतील मूल्यांकनात राज्यात अव्वल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेत २४ घटकांतील मूल्यांकनात अव्वल येत पुणे पोलीस आयुक्तालयने प्रथम क्रमांक मिळविला आहे. महासंचालक कार्यालयच्या स्पर्धेचा जाहीर झालेल्या निकालात पुणे पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे … Read more

तरूणीच्या अंगावर ॲसिड टाकल्याप्रकरणात जामीन

बोपदेव घाटात घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बोपदेव घाटात तरूणीच्या अंगावर ॲसिड टाकून जखमी केल्याप्रकरणात एकाला विशेष न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी 25 हजराचा जामीन मजुर केला आहे. दीनेश श्रीपत धुमक (वय 39, रा. बावधन) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. तिला किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यामुळे भादवी कलम 326 (अ) लागू … Read more

महिलांचे मोबाईल फोन हिसकवणारी आंतरराज्यीय टोळी अखेर जेरबंद

विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौदा मोबाईलसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौदा मोबाईल, दोन मोटारसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने … Read more

दुकानातील कामगारांनीच विकले चार लाख ४० हजारांचे फॅन

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : शिलाविहार कॉलनीतील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोथरूडमधील इलेक्ट्रिक दुकानामध्ये काम करणाऱ्या दोघांनी चार लाख ४० हजार रुपयांचे ४४० फॅनची परस्पर विक्री केली. ही घटना फेब्रुवारी २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडली. अजित नहार (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल … Read more