आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कात्रज मधील पाणीप्रश्न पेटला, काही भागाला सुरळीत पाणी तर काही भागावर अन्याय

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue, Social • March 24, 2022

माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतीक कदम व महेश कदम यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दक्षिण पुण्यातील सुखसागर नगर भाग 1 व 2, दत्तनगर, भारत नगर, वाघजाई नगर, जाधव नगर, राजीव गांधी नगर, कात्रज -कोंढवा रोड या भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील यावर प्रशासन कुठलीही ठोस उपाययोजना करत नाही त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतीक कदम व महेश कदम यांच्या नेतृत्वात शिवगोरक्ष मैदान येथून महादेव नगर येथील पाण्याच्या टाकीवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना प्रकाश कदम म्हणाले प्रशासन आणि सत्ताधारी यांचे दुर्लक्ष असल्याने अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील या भागाला एक तास देखील जास्त दाबाने पाणी मिळत नाही. दोन चार दिवस झाले नागरिकांना पाणी नाही, गरीब लोकांना पाणी साठवण्यासाठी साधन नाही. 24x7 पाणी पुरवठा असून तो अपयशी आहे जर पाणी मिळत नसेल 24x7 योजना आणली कशाला? आज आम्ही शांतेतेच्या मार्गाने मोर्चा काढतोय पण जर प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू. पाणी पुरवठा करता येतं नसेल तर गावे समाविष्ठ केलेच कशाला? महादेव नगर येथील 70 लाख लिटरची टाकी असून ती पुर्ण क्षमतेने भरत नाही असे कदम यांनी बोलताना सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता प्रशांत कुंभार, संदीप मिसाळ, योगेश मोरे उपस्थित होते. आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

पाण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला आहे यांचे निवेदन पाणी पुरवठा विभागाकडून घेतले असून वरिष्ठ अधिकारी पावस्कर यांनी याबाबत सर्व वरिष्ठांची बैठक बोलवली असून यावर तोडगा काढण्यात येईल.

प्रशांत कुंभार –उप अभियंता –स्वारगेट पाणी पुरवठा विभाग.

70 एम एल डी पैकी आम्हाला 20 एम एल डी देखील पाणी दिले जात नाही मग पाणी जातेय कुठे पाणी मिळावे यासाठी आंदोलन करावे लागत आहे. 24×7 पाणी नाही दिल तरी चालेल पण हक्काचं पाणी नागरिकांना द्या. टाकी बांधून देखील पाणी मिळत नसेल तर करायचं काय जर यावर तोडगा निघाला नाहीं तर आम्ही वेगळ्या प्रकारचं आंदोलन करू.

प्रतिक कदम, अध्यक्ष प्रगती फाउंडेशन.

get_footer();