आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रालयात घेतले महामानवांचे दर्शन

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue, Social • July 4, 2023
Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेस पुष अर्पण करून अभिवादन केले, तसेच या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढनिर्धार केला. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अदिती तटकरे, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अनिल भाईदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.