आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शिक्षक पूजनातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरूपौर्णिमा साजरी

maharashtra jain warta • News Slider, Other, Political, Previous Issue, Social • July 4, 2023
Spread the love

गुरूपौर्णिमेनिमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांचा उपक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : आईवडिलांनंतरचे दुसरे गुरू म्हणजे शिक्षक असतात, त्यामुळे गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा, असे प्रतिपादन नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केले.

गुरूपौर्णिमेनिमित्त क्रिस्टंट हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व पुणे महानगरपालिकेच्या श्री संत नामदेव महाराज शाळेमध्ये सर्व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आईवडिलांनंतर दुसरे गुरू असणाऱ्या सर्व शिक्षकांना नमस्कार करून दिवसाची सुरूवात करावी असे विद्यार्थ्यांना सांगून त्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षक आपल्याकडील बहुमोल ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना घडवतात. याच ज्ञानाचा वापर करून आपल्या सामाजिक, कौटुंबिक जीवनात आपण वावरत असतो. या प्रवासात अनेक जण भेटत रहातात, अडचणी, प्रश्न समजून घेतात. हे देखील एकप्रकारे धडे देणारे गुरूच असतात. मात्र, जगाचा सामना करायला शिकवणाऱ्या गुरूंचा आदर केला पाहिजे, असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी पुना कॉलेजचे प्राचार्य अल्ताफ शेख, महानगरपालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापक जयराम पारधी, निर्मला जाळींदे, क्रिस्टंट ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शालिनी दुबे, निरोफर शेख,नादिया शेख,यास्मिन पटेल,फरा दारूवाला तसेच कार्यकर्तेही उपस्थित होते.