आमदार माधुरी मिसाळ : प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून साकारली विविध शिल्पे
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये अनेक नेत्यांचे पुतळे आहेत मात्र, अडचणीच्या काळात ज्या घटकांनी शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला, त्यांचे पुतळे पहिल्यांदाच मला पाहायला मिळाले. या शिल्पांमुळे मार्केट यार्डची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्यासाठी नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी मोठी कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.
मार्केट यार्डमध्ये नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या शिल्पांचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, दी पूना मर्चंट्स चेंबरचे राजेंद्र बाठिया, आडते असोसिएशनचे अनिरुद्ध भोसले व जीतोचो अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विजयकांत कोठारी, अप्पासाहेब गायकवाड, विलासशेठ भुजबळ, चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव राजकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, कार्यकारिणी सदस्य अनिल भन्साळी, दिलीप कर्नावट, संजय चोरडिया, शांतीलाल कटारिया, अरविंद शहा, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नगरसेविका कविता वैरागे, राजेश्री शिळीमकर, माजी नगरसेविका मनिषा चोरबेले, मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, नरेंद्र पवार, विश्वास ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनील कांबळे म्हणाले की, पुणे शहरात नव्हे, तर महाराष्ट्र अशा पद्धतीने कुठेही पुतळे उभारले नाहीत. या पुतळ्यांमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरसेवक प्रवीण चोरबेले म्हणाले की, मागिल दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळामध्ये मार्केटमधील विविध घटकांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन जीवाची पर्वा न करता पुणेकरांसाठी काम केले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी व त्यांच्या कष्टाचा त्यांना सन्मान मिळावा यासाठी हमाल, तोलणार, कामगार, आडतदार यांची शिल्पे परिसरात उभारली आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिवा केंगारे, अमित मशाले, मयूर कोठारी, हेमंत देशपांडे, आयुष चोरबेले, राज ललवाणी, राजकुमार गांधी, सागर मुनोत, अनिल अग्रवाल, जयेश कर्नावट, पियुष चोरबेले, कृष्णा मशाले, हेमंत जगताप, दिलीप चोरबेले, सुभाष सरपाले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक, तर राजेंद्र सरदेशपांडे यांनी आभार मानले.
