मुंढवा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली. त्याच्याकडुन एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५ आर. राजा यांनी परीमंडळ-५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
त्या अनुशंगाने मुंढवा पोलीस ठाणे येथे चोरीस गेलेल्या हीरो होंडा आय स्मार्ट गाडीचा शोध घेण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी मुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मुंढवा तपास पथक अधिकारी व स्टाफ मुंढवा पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार, दिनेश राणे यांना यापुर्वी वाहन चोरीच्या गुन्हयातील पकडलेला अल्पवयीन दुचाकीवर जात असताना दिसुन आला. त्याला थांबवुन वाहनाबाबत विचारपुस केली असता, त्याने समर्पक उत्तर न दिल्याने पोलीस ठाणे अभिलेख पडताळुन पाहण्यात आले. मुंढवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद असल्याची माहीती मिळाली.
वाहन त्यानेच चोरल्याची खात्री झाली. अल्पवयीन बालकाकडे त्याच्या पालकासमक्ष अधिक चौकशी केली असता, त्याने एकुण १० दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. वाहने जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग रंजनकुमार शर्मा,सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), संगिता रोकडे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांनी केली आहे.
