आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, News, News Slider, Social • October 2, 2024
Spread the love

बार्शी : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने लोहार- गाडी लोहार समाजातील बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात कॉलेस्ट्रॉल, लिव्हर, थायरॉईड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, इसीजी , तसेच दातांची व हाडांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी डॉ.शितल बोपलकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. तेजस लाड, डॉ. किरण लाड, डॉ. अभिजित साळुंखे, महालॅब्सचे युसुफ जमादार शिक्षक धनाजी सोनटक्के, आकाश लोहार, प्रतीक्षा राजेगावकर, रितेश जानराव, निकिता अडसुळे यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिरासाठी सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.