आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

संविधानाच्या अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाईसह आर्थिक मदतीची मागणी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People • December 16, 2024
Spread the love

पुणे – संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने भूम येथे करण्यात आली. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिमेचा अवमान व नासधूस करण्यात आल्याची घटना १० डिसेंबर २०२४ रोजी घडली. या घटनेचा निषेध करत संविधानविरोधी कृत्ये थांबवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे, आंदोलनादरम्यान पोलिस कारवाईत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रुपयांची मदत द्यावी व या घटनेस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद केली.

सध्या देशात धर्मांध व जातीयवादी प्रचार-प्रसार असून, विचारांचा वाढत संविधानविरोधी
शक्तींना पाठबळ मिळत आली.

असल्याचा आरोप संघटनेने केला. परभणीतील घटनेने संविधानाच्या अवमानाचा संतापजनक प्रकार समोर आणला असून, अशा प्रकारांना सरकारने कठोर पाऊले उचलून आळा घालावा, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच परभणी जिल्ह्यातील कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. हे ऑपरेशन थांबवून कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने भूम येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी भागवतराव शिंदे (मराठवाडा उपाध्यक्ष, आरपीआय आठवले गट), मुकुंद लगाडे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, VBA), हनुमंत सोनवणे, महावीर बनसोडे, शुभम पालखे, राजा जाधव, शिवाजी साळवे, विश्वास शिंदे, संजू गायकवाड, भारत काळे, सुभाष काळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.