आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एका ठोशात तरुणाचे नाकाचे हाड केले फ्रॅक्चर

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Police, Social • December 24, 2024
Spread the love

पुणे: किरकोळ वादातून झालेल्या भांडणात तरुणाने दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या नाकाचे हाड फॅक्चर केल्याची घटना येरवड्यात घडली.

या प्रकरणी गणेश देवरे (वय ४३, रा. अमरधाम हिंदु स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी धीरज रवींद्र गोगावले (वय २५, रा. रामनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास येरवड्यातील अमरधाम हिंदू स्मशानभूमीच्या सिक्युरिटी केबीनजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश देवरे हे स्मशानभूमीत काम करत असून तेथेच राहतात. आरोपी धीरज गोगावले याने देवरे यांना “तुझ्याकडे काम आहे,” असे सांगून केबीनजवळ बोलावले.

देवरे तिथे पोहोचल्यानंतर गोगावले त्यांना म्हणाला, “मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय? देवरे यांनी “तुम्ही काय बोलताय हे मला समजले नाही,” असे उत्तर दिले. यावर गोगावलेने कोणताही खुलासा न करता देवरे यांच्या तोंडावर, नाकावर आणि हाताने बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत देवरे यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. त्यानंतर गोगावलेने त्यांना जमिनीवर ढकलून धमकी दिली.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करीत आहेत. आरोपीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.