आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाघोलीत पहाटे गोळीबार

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Police, Social • December 25, 2024
Spread the love

पुणे : वाघोली येथील एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत बेडरूमच्या खिडकीची काच फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी घडली. निलेश सुभाष सातव (वय ३६, रा. वडजाई वस्ती, डोमखेल रोड, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निलेश सातव हे शेतकरी असून, ते आपल्या कुटुंबासोबत घरी झोपले असताना अचानक गोळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले.

या गोळीबारामुळे त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची काच फुटली. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा गोळीबार धमकाविण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे.

मात्र, गोळीबार करण्यामागचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
वाघोली पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.