आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबट्याच्या हल्ल्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • December 28, 2024
Spread the love

भूम: मागील काही दिवसांपासून परांडा विधानसभा क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला होता. बिबट्याने 14 ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय, भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावातील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या घटनांमध्ये एकूण 15 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यापैकी 9 शेतकऱ्यांना एकूण 1 लाख 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांचा पाठपुरावा सुरू आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

परांडा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाठपुराव्यामुळे मोठा आधार मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.