आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन युवकाचा खुन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Police • January 2, 2025
Spread the love

पुणे : पूर्वी मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरुन मुलीचे वडिल, भावासह तिघांनी युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन खुन केला. ही घटना वाघोलीतील वाघेश्वरनगरमधील गोरे वस्तीतील पेटकर यांच्या घरासमोर २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा च्या सुमारास घडली.

नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली) यांना अटक केली आहे. गणेश वाघु धांडे (वय १७, रा. गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वडिल वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा आरोपीच्या मुलीसोबत पूर्वी बोलत होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. गणेश धांडे हा इतर मित्रासोबत मोटारसायकलवरुन गोरे वस्ती येथील घरी येत होता. पेटकर यांच्या घरासमोर तिघांनी गणेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉड व दगड डोक्यात मारुन गणेश याचा खुन केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत.