अत्याधुनिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात; पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अत्याधुनिक व परवडणाऱ्या दरात दर्जेदार डायग्नॉस्टिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डायग्नोपिन’च्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
‘डायग्नोपिन’ हे आज महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येकाला वेळेवर अचूक निदान व योग्य उपचार मिळू शकतील.
अनेकदा आर्थिक अडचणींमुळे नागरिक आवश्यक वैद्यकीय तपासण्या टाळतात आणि त्यामुळे गंभीर आजारांचे निदान उशिरा होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘डायग्नोपिन’ सातत्याने प्रयत्नशील असून, या नव्या शाखेमुळे नागरिकांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
या शाखेमध्ये MRI, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, दंत उपचार, एक्स-रे, ईसीजी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधुनिक मशीनरी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांना जलद, अचूक आणि विश्वासार्ह निदानाचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे MRI तपासणी सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत फक्त ₹२५०० मध्ये, तर रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत केवळ ₹१९०० मध्ये उपलब्ध आहे. तसेच सोनोग्राफी ₹५०० पासून, डेंटल रूट कॅनल ₹१५०० पासून, शुगर टेस्ट ₹४० पासून, HbA1c ₹३२० मध्ये आणि एक्स-रे ₹३०० मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अत्यंत अल्प दरात दर्जेदार सेवा देण्याचा ‘डायग्नोपिन’चा हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र दर्डा (अध्यक्ष, सकल जैन समाज), करण दर्डा (लोकमत), समीर राजुरकर (महापौर), शंकर म्हात्रे (नगरसेवक), पुरुषोत्तम दरख (अध्यक्ष, सकल मारवाडी महासभा), झुंबरलाल पगारिया (अध्यक्ष, स्थानकवासी श्रावक समाज), अनिल संचेती (अध्यक्ष, मूर्तिपूजक संघ), सचिन करवा (अध्यक्ष, माहेश्वरी समाज), कैलाश चांदीवाल (पूर्व न्यायमूर्ती, हायकोर्ट), पुखराज बोरा (पूर्व न्यायमूर्ती, हायकोर्ट), मिठालाल कांकरिया (अध्यक्ष, महावीर भवन), सुशील भारुका (पूर्व अध्यक्ष, अग्रवाल समाज), इंदरचंद संचेती (मंत्री, वर्धमान श्रावक संघ), गौतमचंद संचेती (पूर्व अध्यक्ष, भारतीय जैन संघटना), दयानंद मोदानी (चेअरमन, महेश को-ऑप बँक, उद्योजक), राजेश कांकरिया (पूर्व अध्यक्ष, सिडको श्रावक संघ), विकास जैन (पूर्व महापौर), हीरालाल भंडारी (ज्येष्ठ श्रावक समाज), डॉ. प्रकाश झांबड (अध्यक्ष, सिडको श्रावक संघ), पंकज फूलफगर (अध्यक्ष, गौतमनिधी फाउंडेशन), विलास साहूजी (उपाध्यक्ष, सकल जैन समाज), पारस तातेड (अध्यक्ष, दक्षिण मध्य श्रावक संघ), रामेश्वर तोतला (पूर्व अध्यक्ष, वकील महासंघ), शांतिलाल सिंगी (अध्यक्ष, वर्धमान नागरी पतसंस्था), सतीश ललवाणी, राजेश पाटणी, आशीष कटारिया, रवि खिंवसरा, आरुष पारेख, महावीर पाटणी, अरविंद डोणगावकर, किशोर माणकपे, बबन डिडोरे, सुनील पवार, विश्वजीत उबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘डायग्नोपिन’चे संचालक मितेश कोठारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार मानले. तसेच सतीशजी बनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डायग्नोपिन’ पुढेही अशाच प्रकारे आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



















