आवृत्ती पुणे

कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला मारहाण करणारे तिघे जेरबंद

खराडीतील कोठारी ह्युंदाई शो-रुमसमोर घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शो-रूम मधील कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या राग मनात धरुन शो-रुमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडी येथील कोठारी ह्युंदाई शोरुमच्या गेट समोर सोमवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रशिद अब्बास मुल्ला (वय-57 … Read more

कोंढवा पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पती-पत्नीच्या भांडणाचे पर्यवसन – महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आफरिन उमर शेख (वय-21 रा. नवाझिस पार्क, कोंढवा) … Read more

पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान : उपनगरातील बाणेर, हडपसरमध्ये लाखोंची चोरी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोरोनाचा ज्वर कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात गुन्ह्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. बाणेरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तर हडपसर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करुन 88 लाखाचा ऐवज चोरुन नेला होता. पुण्यातील या घटना ताज्या … Read more

रिक्षावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

तळजाई- कै. सदू स्टेडियमजवळ घडली घटना- रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तळजाई टेकडीवरून बिकानेर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कै. सदू स्टेडियमजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अनिल मेगडे यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकावर … Read more

दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद, एक फरार

युनिट-४ची कारवाई : बापट रस्त्यावर समर्थ स्टँडजवळ केली कारवाई पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दरोडा टाकून लुटमार करण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई सेनापती बापट रोडवरील समर्थ रिक्षा स्टँड जवळ मंगळवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली. पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून … Read more

अडीच लाखांचा गांजा बाळगणाऱ्यास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत : लोणीकंद पोलीस स्टेशनामध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : अडीच लाखांचा गांजा बाळगणाऱ्यास एकास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली असून, लोणीकंद पोलीस स्टेशनामध्ये गुन्हा दाखल करून १३ किलो गांजा, एक दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंगळवारी (दि. २४) … Read more

बाप रे… भाडे तत्त्वावर 77 कार घेऊन केला दारू वाहतुकीसाठी वापर

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात ४६ कार घेतल्या ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा अपहार करीत त्या दारुच्या वाहतुकीसाठी वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या तपासातून ही बाब समोर झाली आहे. त्यातील 46 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात … Read more

दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाघोलीतील भावडी रोडवरील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नागरिक कामाच्या ठिकाणी दुचाकीवर भावडी रोड (वाघोली, ता. हवेली) वरून जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडावर आदळली. त्यामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बबन अच्युतराव मोहिते (वय ७२, रा. जाधववस्ती, भावडी रोड, वाघोली, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ … Read more

इंटरनेट बँकिंगद्वारे दीड लाखाची फसवणूक

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क इंटरनेट बँकिंगद्वारे १० रुपयांचे रिचार्ज आणि केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणी खराडी (थिटेवस्ती) येथील व्यक्तीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे .पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी … Read more