आवृत्ती पुणे

शाहू कॉलनीतील मनपा शाळेतील संगणकाची चोरी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कर्वेनगर, शाहू कॉलनी गल्ली नं.१ मधील शाळेत कोविड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून संगणक चोरून नेला. ही घटना २३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते २४ ऑगस्ट २०२१ च्या दरम्यान आठ दरम्यान घडली. याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये … Read more

भाजी खरेदी करत असताना दोघांनी हिसकावून नेला मोबाईल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रजमधील साईपार्क बिल्डिंग येथे भाजी खरेदी करीत असताना दोघांनी जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तनगर (जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार लवित अप्पासाब कार्सर (वय ३०) आणि विनयकुमार कृष्णा गौड (वय १८, दोघे … Read more

कोंढव्यात पतीनं 21 वर्षीय पत्नीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले

लैला-मजनूने पतीला हाताने-दगडाने मारहाण करून केले जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय होता़, त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका 50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर 21 वर्षाची पत्नी जात असल्याचे त्याला आढळून आले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्याचा राग आल्याने लैला-मजनूने पतीला हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. कोंढव्यातील एका सोसायटीसमोर मंगळवारी … Read more

जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारे सराईत अटकेत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठ गुन्हेगारांना शिताफीने घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारऱ्या आठ सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. रविवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समृद्धी लेकशायर सोसायटीसमोर असलेल्या पानटपरीशेजारी जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे येथे पूर्वीच्या भांडणाचा … Read more

दोन एकरात गांजा लावण्यासाठी शेतकऱ्याने मागितली परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अर्ज : इतर पिकांना हमीभाव नसल्याने केली मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : इतर पिकांना हमीभाव नसल्यामुळे तोट्यात असलेल्या शेतीसाठी एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जमिनीवर चक्क गांजा लावण्याची रीतसर परवानगी मागणारा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला असून, या परवानगीसाठी दि. १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या अजब अर्जाची आता सर्वत्र जोरदार चर्चा होत … Read more

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात रिक्षाचालकांविरोधात बार्शीत गुन्हा

रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या रिक्षा : कलम २८३ अन्वये एकाच दिवशी गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : वाहतुकीस अडथळा होईल व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशारीतीने रस्त्यात रिक्षा उभी करणाऱ्या सात रिक्षाचालकांविरोधात कलम २८३ अन्वये शहर पोलिस ठाण्यात एकाच दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील रिक्षाचालकांविरोधात अशाप्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच … Read more

कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला मारहाण करणारे तिघे जेरबंद

खराडीतील कोठारी ह्युंदाई शो-रुमसमोर घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शो-रूम मधील कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या राग मनात धरुन शो-रुमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडी येथील कोठारी ह्युंदाई शोरुमच्या गेट समोर सोमवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रशिद अब्बास मुल्ला (वय-57 … Read more

कोंढवा पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पती-पत्नीच्या भांडणाचे पर्यवसन – महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आफरिन उमर शेख (वय-21 रा. नवाझिस पार्क, कोंढवा) … Read more

पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान : उपनगरातील बाणेर, हडपसरमध्ये लाखोंची चोरी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोरोनाचा ज्वर कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात गुन्ह्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. बाणेरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तर हडपसर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करुन 88 लाखाचा ऐवज चोरुन नेला होता. पुण्यातील या घटना ताज्या … Read more

रिक्षावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

तळजाई- कै. सदू स्टेडियमजवळ घडली घटना- रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तळजाई टेकडीवरून बिकानेर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कै. सदू स्टेडियमजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अनिल मेगडे यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकावर … Read more