आवृत्ती पुणे

चोरी गेलेले 42 मोबाईल केले नागरिकांना परत

लष्कर पोलिसांची कामगिरी : महागडे मोबाईल मिळाल्याने मानले आभार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर परिसरातून चोरी गेलेले ४२ मोबाईल फोन लष्कर पोलिसांकडून नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून लष्कर पोलिसांकडून ही कामगिरी करण्यात आली. ४ लाख ७५ हजार एवढी या मोबाईलची किंमत आहे.लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी (दि.१४) नागरिकांच्या … Read more

पिकअपचालक गंभीर जखमी, तर क्लीनरचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : बंद ट्रकला धडकून झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला धडकून पिकअपचालक गंभीर जखमी झाला, तर क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी दरी पुलावर १४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.सायास शंकर चाटे (वय ३८, रा. मु.पो. चिंबळी, बर्गेस्ती, ता. खेड, पुणे) … Read more

सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या खुनातील दोघे जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक दिवस घरात पडून होता मृतदेह महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील सॉफ्टवेअर अभियंत्याने कौटुंबिक कारणावरुन स्वत: गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला गेला असतानाच त्याला कलाटणी मिळाली. कोंढवा पोलिसांनी या अभियंत्याच्या दोघा मित्रांना अटक केली आहे. सागर दिलीप बिनावत (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय … Read more

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कामगिरी : उच्च शिक्षित तरुणीने पोलिसांकडे तक्रार करताच केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उच्चशिक्षणघेत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय २१, रा. शिवांश हाईट्स, शिंदेनगर, मारुंजी, पुणे, मूळ गाव- … Read more

फ्लॅट परस्पर विकून महिलेला १८ लाखांना फसविले

कोथरूड पोलिसांत गुन्हा : ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचा व्यवहार करुन एका महिलेकडून 18 लाख रुपये घेऊन तो फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह ५ जणांवर कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 … Read more

ॲडमिशन देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हा

निवृत्त प्राचार्यासह चौघांचा समावेश : खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयातील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खडकवासला येथील डी.आय.टी. गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून तब्बल १७ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त प्राचार्य व त्यांच्या मुलासह चौघांवर हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रदीप सद्य सांगोले आणि त्यांचा मुलगा … Read more

खुनी नराधम बारा तासांच्या आत जेरबंद

गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ची कामगिरी : क्षुल्लक कारणावरून दगडाने मारून केला खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारचाकीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराचा लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून खून करणाऱ्या नराधमास बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ला यश मिळाले असून आरोपीस लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले … Read more

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्र. ४१चा दीक्षान्त संचलन समारंभ

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उपस्थिती : प्रशिक्षणार्थींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दौंड : पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्र. ४१चा दीक्षान्त संचलन समारंभ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी प्रशिक्षणार्थींना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, … Read more

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून!

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्त्यावर कालव्यावरील रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे.ही घटना सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठाच्या मागील बाजूला कॅनॉल रोडजवळ मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली. योगेश अंकुश भोकरे (वय ३८, … Read more

पोलिसांवर दबाव आणण्यासाठी तिघांचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील घटना : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून त्यातील तिघांनी स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी त्यांना अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात … Read more