आवृत्ती पुणे

मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद

पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी : अठरा लाखांची एकूण ३१ वाहने जप्त महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पंढरपूर : पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून १८ लाख रुपये किमतीच्या एकूण ३१ मोटारसायकली केल्या जप्त केल्या आहेत.पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात १९ जून रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासकामी … Read more

भररस्त्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा जेरबंद

वानवडी पोलिसांत गुन्हा : वानवडीतील केपीसीटी मॉलसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार वानवडी येथील केपीसीटी मॉलच्यासमोर सोमवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास … Read more

ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई : ८८ हजार रुपयांच्या दोन अंगठ्या व स्कूटर केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला पुणे गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई विश्रांतवाडी येथील बीआरटी बसस्टॉप येथे केली. सदर … Read more

जुन्या वादातून गंभीर जखमी करणारा जेरबंद

उत्तमनगर पोलिसांत गुन्हा : उत्तमनगरमधील सार्वजनिक रस्त्यावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून शिवीगाळ करीत डोक्यात मारून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद केले. ही घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) गुलमोहर अपार्टमेंट, मासेआळीसमोरील बोळात सार्वजनिक रस्त्यावर उत्तमनगर येथे घडली.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे भावासोबत जुन्या वादातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने शिवीगाळ करून … Read more

30 हजाराची लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

चऱ्होली येथे केली कारवाई : दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हक्क सोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर करण्यासठी 50 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना चऱ्होलीच्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.27) करण्यात आली. मारुती पवार (वय-41) असे लाचखोर तलाठ्याचे … Read more

पुणे विद्यापीठाचे बनावट मार्कलिस्ट तयार करणारी टोळी ‘जेरबंद’

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर महाविद्यालयाचे नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट तसेच सर्टिफिकेट बनावट तयार करुन त्याची विक्री करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलीसांचे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. गणेश जावळे, मनोज धुमाळ (दोघे रा. निरा, पुणे), वैभव लोणकर (रा. बारामती, पुणे) … Read more

अल्पवयीन मुलीची बाधा दूर करण्यासाठी अघोरी पूजा

भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा : स्थानिकांनी हटकल्यानंतर मांत्रिकासह सर्व पळाले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीची बाधा दूर करण्यासाठी म्हणून सुरूरच्या स्मशानभूमीत एक मांत्रिक अघोरी पूजा करताना आढळला. दरम्यान, स्थानिकांनी मांत्रिक व मुलीसोबत आलेल्यांना हटकल्यावर त्यांनी स्मशानभूमीतून पळ काढला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, विवेक वामन चव्हाण (वय … Read more

शुक्रवारी एक ऑक्टोबर रोजी सोलापुरात होणार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची लेखी परीक्षा

प्रवेशपत्रासाठी लिंक खुली : सोबत काय आणू नये याबाबत कडक सूचना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : शुक्रवारी एक ऑक्टोबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थपनेवरील रिक्त असलेल्या जागांवर पोलीस भरती २०१९ ची लेखी परीक्षा होणार असून, त्यासाठीच्या प्रवेशपत्रासाठी लिंक खुली करण्यात आली आहे. परीक्षेला येताना सोबत काय आणावे आणि काय आणू नये, याबाबत कडक … Read more

विवाह विषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात

महिलेला 16 लाखांचा गंडा : सायबल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून महिलेला 16 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर तिचे नाव नोंदविले होते. त्यानंतर आरोपीने महिलेबरोबर संपर्क … Read more

रेल्वेच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू

लोणंद रेल्वे स्टेशनजवळ दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी (दि. २६) सांयकाळी बंगळुरू- जोधपूर एक्‍सप्रेस रेल्वे गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28) व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा रुद्र बोडके या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. अंदोरी येथील शैलेश बोडके … Read more