आवृत्ती , पुणे

चोरट्याने अडीच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

लष्कर पोलिसांत फिर्याद : उघड्या घरात प्रवेश करून चोरट्याने साधली संधी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उघड्या घरातून चोरट्याने दोन लाख ४८ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला. कॅम्पमधील स्टर्लिंग हाऊस, चोक्सी शाळेजवळ १ जानेवारी सायंकाळी ६ ते १४ जानेवारी २०२२ सायंकाळी सहाच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी राबिया शेख (वय ३०, रा. कॅम्प, … Read more

चक्क जनरल स्टोअर्समध्ये गांजाची विक्री

हवेली पोलिसांची कामगिरी : शौर्यचा वैभव वनवे गोत्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जनरल स्टोअर्सच्या नावाखाली गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) मौजे खानापूर येथे करण्यात आली. आरोपीकडून 17 हजार 720 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. वैभव विठ्ठल वनवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे … Read more

फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या मजनूला ठोकल्या बेड्या

खडक पोलिसांची कारवाई : कस्तुरी चौकात भावांनी धू धू धुतला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्री करण्यासाठी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी धु धु धुतला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शुभम कैलास दारवटकर (वय 22, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. … Read more

प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

येरवडा पोलिसांची कारवाई : भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भावाने आत्महत्या केल्याच्या रागातून त्याच्या प्रेयसीच्या मुलाचे जीवे ठार मारण्याच्या हेतूने अपहरण करणार्‍या चौघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे कल्याणीनगर येथून अपहरण करुन पेरणे फाटा येथे नेण्यात आले होते. विजय राम गेचंद (वय २५), सुरज गंगाराम मौर्य … Read more

पत्नीचा खून करून फरार पतीला २४ तासांत केले जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने केली होती जबर मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचा खून करून फरारी झालेल्या पतीला २४ तासांत पकडून अटक केली. न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली. मैनोद्दिन अब्बास शेख (वय ७१, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) … Read more

जाणिव फाउंडेशनने निराधारांना दिले उबदार कपडे

शहर परिसरात थंडीने काकडणाऱ्या पदपथ, रस्त्यावरील गरजूंना मिळाली मायेची उब महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागिल काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे. मात्र, शहर परिसरातील रस्ता, पदपथ आणि उघड्यावरील निराधारांना जाणिव फाउंडेशनच्या वतीने स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट देत मायेची उब दिली. कडाक्याच्या थंडीपासून निराधारांना काही अंशी मदतीचा हात पुढे केल्याची भावना … Read more

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चौघांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : बोपदेव घाटात घडली चोरीची घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने सहा हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख एक हजार रुपये लुटून नेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बोपदेव घाटात १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. रामा थापा (वय २२, … Read more

हॉटेल साहिलचे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा

खडक पोलिसांत फिर्याद : सहा वर्षात परतावा न देता केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल, इलेक्ट्रीकल, जीम, बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या परतावाचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडल्यानंतर गेल्या ६ वर्षात कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शैलेंद्र पाटील (वय ४९ रा. मिरा सोसायटी, शंकरशेठ … Read more

२० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांत फिर्याद : खराडी-लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये युवतीवर बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी राहणार्‍या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर … Read more