आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणाऱ्या यश मेरवाडेवर स्थानबध्दतेची कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Police, Social • December 19, 2023
Spread the love

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पर्वती पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, यश उर्फ मनोज मेरवाडे याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यश उर्फ मनोज मेरवाडे, (वय-२२ वर्ष, रा.स.नं. १३०, दांडेकर पुल, मारणे गिरणी समोर, सिंहगड रोड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहे.
यश मेरवाडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार, लोखंडी रॉड, बांबू या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, साधी दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ७० कारवाई आहे.