आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

“अल्पसंख्याक हक्क” विषयावर विशेष मार्गदर्शन

Spread the love

जितो लेडीज विंगच्या वतीने आयोजन

पुणे : जितो कार्यालयात अल्पसंख्याक सेल समिती अंतर्गत “अल्पसंख्याक हक्क” या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मायनोरीटी अँपेक्सचे माजी अध्यक्ष ऍड योगेश मेहता यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी 48 सदस्य उपस्थित होते. सध्याच्या सरकारी अल्पसंख्याक योजनांबद्दल जागरूकता, अल्पसंख्याक प्रमाणपत्राचे महत्त्व, नवीन ज्ञानाद्वारे महिलांचे सक्षमीकरण याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ. लकीशा मर्लेचा आणि मुख्य सचिव मोना लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक भारती शहा, संयोजक सोनिया लोढा आणि सहसंयोजक नीता बोरा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मायनॉरिटी जितो अँपेक्सच्या व्हाईस चेअरमन सोनिका शहा आणि जितो अँपेक्स SSB संयोजक मनीषा ताटेड उपस्थित होते.