स्वारगेट पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास जेरबंद करण्यात स्वारगेट पोलीसांना यश आले आहे.
ज्ञानेश्वर रामटेके( वय २१ वर्षे रा. डॉल्फिन चौक अप्पर) व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दाखल गुन्हयातील त्यांनी चोरी केलेली बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर परिसरातुन चोरी केलेले एकुण २९ मोबाईल फोन असा एकुण ४,९०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची पीएमटी बस क्रमांक एम.एच.१२-एच / बी ०३९९ ही बस सणस ग्राऊंड समोरील रोडवर पार्क ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने गाडीची बॅटरी चोरुन नेली. म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या वाहनाचा व अज्ञात चोरटयाचा हददीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार फिरोज शेख, दिपक खंदाड व संदीप घुले यांना माहिती मिळाली कि, दाखल गुन्हा केलेले आरोपी हे जेधे चौक स्वारगेट येथील अंडाभुर्जीचे स्टॉलजवळ थांबले आहेत. तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांना माहिती दिल्याने लागलीच कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार फिरोज शेख, दिपक खंदाड, संदीप घुले यांच्यासह मिळुन माहितीच्या ठिकाणी गेले असता दोन संशयित व्यक्ती दिसुन आल्या. त्यांना वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारताच त्यांनी गुन्हा कबूल केला.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, रमेश चव्हाण, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, यांनी एकत्र मिळुन केली आहे.
