पीसीबी गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वारजेमाळवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, ऋषीकेश केदारी या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
ऋषीकेश केदारी, (वय २१ वर्षे, रा. बालाजी मेडीकल समोर, रामनगर वारजेमाळवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, सुरी या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापतीसह जबरी चोरी, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ७३ वी कारवाई आहे.
