खडकी पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळी प्रमुख शुभम कवाळे उर्फ मांडा व त्याच्या ६ साथिदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. खडकी पोलीसांनी ही कारवाई केली.
गुन्हा हा शुभम कवाळे उर्फ मांडा, (वय- २८ वर्षे, रा. पत्ता- ३९ औध रोड, चव्हाण वस्ती, बोपोडी) विकी नादन (वय २९ वर्षे रा. स.नं. ३८, औधरोड, भाउपाटील, पडयाळवस्ती, बोपोडी) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अनुज वाघमारे, मोहित सावंत, अतीक गरूड, रोहन ठोकळे, एक विधी संघर्षित बालक हे पाहिजे आरोपी आहेत.
फिर्यादी हे औंधरोड पडाळ वस्ती, खडकी येथील चड्डा यांचे कबुतराचे ढाबळीतील कबुतरे पाहण्यासाठी त्यांच्या मित्रांसह गेले. तेथे जवळच असलेले पानटपरीवर थांबलेला मांडा उर्फ शुभम कवाळे, त्याचे इतर दोन साथीदार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी यांना इथे कशाला आलात असे विचारले. माझे घर इथेच आहे, मी काय येऊ शकत नाही का असे फिर्यादी म्हणाले असता त्यांना सैमुअल पाटोळे याने पाठीमागून डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून हातातील हत्यार फिरवुन जमलेल्या लोकांना मध्ये कोणी पडले तर त्यास संपवुन टाकू असे म्हणत या ठिकाणी दहशत निर्माण केली. म्हणुन फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
आरोपी विरूध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न करणे व अन्य शरिराविरुध्दचे गुन्हे नोंद आहे. गुन्ह्यातील आरोपी शुभम कवाळे, उर्फ मांडा, यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याव्दारे त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवली. संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. यातील आरोपी यांनी संघटित दहशतीच्या मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा,(मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग आरती बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). मानसिंग पाटील, पोलीस उप निरीक्षक, मालोजी कांबळे, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स अंमलदार रमेश जाधव, महिला पोलीस अमंलदार किरण मिरकुटे व स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०४ वी कारवाई आहे.
