आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोडेखोर बीडमधून आले, जाळ्यात अडकले

Spread the love

महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक कारवाई

पारगाव : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगावजवळील उंदरे पेट्रोल पंपाजवळ दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील आठजणांना वाशी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

या सर्वांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाशी पोलिस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत असताना पारगाव टोलनाका येथून जवळच असलेल्या उंदरे पेट्रोल पंपाच्या जवळ उभ्या असलेल्या एका ऑटोरिक्षामध्ये काही इसम दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत दबून बसलेले असल्याची माहिती मिळाली.
यावरून पो. नि. दसूरकर, स. पो. नि. ससाणे यांनी अन्य सहकाऱ्यांसमवेत तेथे जाऊन या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे अजय दत्तात्रय पुरबूज, आदित्य विजय धवन, युवराज पांडुरंग लहाने, सुमित बाळासाहेब शेजवळ, रितेश प्रभाकर वडमारे, अमोल सुधाकर आढाव, सुमीत सुनील सुसांबड, स्वप्निल जानकीराम तावरे (सर्व राहणार बीड) अशी असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करीत त्यांना अटक करून वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास स. पो. नि. राजकुमार ससाणे करीत आहेत.