सहकारनगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पेट्रोलींग करीत असताना संशयावरून पकडलेल्या आरोपीकडुन सहकारनगर पोलीसांनी चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
सचिन ढवळे (वय ४३ वर्षे रा. शंकर महाराज वसाहत साई मंदिरामागे धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या ४५,००० रूपये किमतीच्या तीन दुचाकी पैकी दोन अॅक्टीव्हा मोपेड व एक होंडा कंपनीची शाईन अशा जप्त करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ असे ख्रिसमस नाताळ सनाच्या अनुशंगाने सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होते. तेव्हा एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील अॅक्टीव्हा मोपेड दुचाकीवर ट्रेझर पार्क कडून येऊन तावरे कॉलनीकडे वेगाने जात असलेला दिसला. त्याचा संशय आल्याने त्याला तपास पथकातील पोलीस हवालदार भुजंग इंगळे व सुशांत फरांदे यांनी ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली. यात त्याच्या ताब्यातील दुचाकी त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने डुब्लीकेट चावीच्या सहाय्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याची माहिती दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे पोलीस अंमलदार बापु खुटवड, बजरंग पवार, अमोल पवार, निलेश शिवतरे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, यांनी केली आहे.
