जकार्ता, इंडोनेशिया येथे होणार स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुणे शहर पोलीस घटक महाराष्ट्र राज्य पोलीस शुटिंग स्पर्धेत चैंपियन सहायक पोलिस निरिक्षक राकेश कदम यांची निवड झाली. जकार्ता, इंडोनेशिया येथे एशिएन शुटींग स्पर्धेकरीता भारतीय संघात २५ मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात ही निवड झाली आहे.
पोलिस बल गट क्र. ०१ पुणे यांनी वडाची वाडी शुटिंग रेंज व शिवछत्रपतीक्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी शुटिंग रेंज येथे महाराष्ट्र राज्य पोलीस शुटिंग (सर्व्हिस वेपन व स्पेर्ट्स वेपन) स्पर्धा २०२३ आयोजीत केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील एकुण १५ सघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुणे शहर पोलीस दलातील एकुण १७ नेमबाजांनी एकुण २० सुवर्ण, १२ रौप्य व ०७ कांस्य पदके प्राप्त केली. त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास सर्व्हिस वेपन, स्पोर्ट्स पुरुष व स्पोर्ट्स महिला या तिन्ही प्रकारात सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवून दिले.
या स्पर्धेत पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी १ सुवर्ण, १ रौप्य, राकेश कदम यांनी २ सुवर्ण,१ रौप्य, महिला सहायक पोलिस निरीक्षक आरती खेतमाळीस यांनी १ कांस्य, पोलिस उपनिरिक्षक धीरज कांबळे यांनी १ कांस्य, नितीन शिंदे यांनी १ रौप्य १ कांस्य, सुनिल पवार यांनी १ रौप्य १ कांस्य, राजेंद्र पाटील यांनी ६ सुवर्ण १ रौप्य, अमोल नेवसे २ यांनी सुवर्ण, महेश जाधव यांनी १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य, अनिल उपरे यांनी १ रौप्य, मंगेश खेडकर १ सुवर्ण, विजय कांबळे यांनी १ कांस्य, वैशाली गोडगे यांनी १ सुवर्ण,२ रौप्य, दत्तात्रय खाडे यांनी १ सुवर्ण, १ रौप्य, सुहास धायगुडे आणि राजेंद्र मोरे यांनी पदके मिळवत चमकदार कामगिरी केली. राजेंद्र पाटील यांनी सलग तिस-या वर्षी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पिस्टल शुटर व सर्वोत्कृष्ट एमपी ५ शुटरच्या किताबासह चषक प्राप्त केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त, (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ हटकर, मांढरे, टेंभूर्णे, साबळे, रोमाडे व हिंगे यांचे सहकार्याने केली.
