महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
भुम : भूम येथील सिद्धिविनायक ज्वेलर्स चे मालक विनायक हनुमंत दहिवाळ (वय 3८ वर्षे) रा. समर्थ नगर ,भूम यांच्यावर अज्ञात ४ चोरांनी, सोने चोरीच्या उद्देशाने बंदुकीने गोळी झाडत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या तळव्याला गोळी लागली. त्यांच्यावर भूम ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुम पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
