मुंढवा पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळी प्रमुख मंगेश तांबे व त्याच्या २ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मुंढवा पोलीसांनी ही कारवाई केली.
मंगेश तांबे, (वय २८ वर्षे, रा. खराडकर पार्क, खराडी), अक्षय गागडे (वय-२४ वर्षे, रा.स.नं.९/१४, गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) कार्तिक गुमाणे, (वय-२० वर्षे, रा.स. नं.९/१४, गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
यातील फिर्यादी हे धायरकर वस्ती, मुंढवा, येथील हॉटेल मध्ये त्यांच्या पत्नीसह जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन वॉशरुमला जात असतांना बाजुच्या टेबल वरील फिर्यादीच्या ओळखीचा मंगेश तांबे याचे त्याचा मित्र अक्षय गागडे व गोट्या पूर्ण नांव माहित नाही यांच्यामध्ये हॉटेलचे बील देण्यावरून आपसांत वाद घालून शिवीगाळ सुरू होती. फिर्यादी यांनी शिवीगाळ करू नका याठिकाणी लेडीज जेवण करीत आहेत असे बोलले. त्याचा राग येऊन मंगेश तांबे याने टेबलावरील रिकामी बियरची बाटली फोडून, फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावर वार केला. त्यामध्ये फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम होऊन दुखापत झाली. त्याबाबत फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाणेस फिर्याद दिली.
आरोपी मंगेश तांबे याने त्याच्या साथीदारासह बेकायदेशिर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर केला आहे. हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मंगेश तांबे याने टोळीतील वेग- वेगळया साथीदारासह तसेच स्वतःजवळ बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, दुखापत, बदल्याची भावना, गैर-कायदयाची मंडळी जमवणे, नुकसान करुन दहशत करणे, खंडणी स्वरुपात पैशाची मागणी अशा प्रकारची गंभीर स्वरुपाचे गुन्हे खडक, बंडगार्डन, मुंढवा अशा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायदयासाठी गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख ह्या करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५,आर. राजा, त्यांच्या मार्गर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुनिता रोकडे, सहायक पोलीस निरीक्षक, राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक, सदाशिव गायकवाड, पोलीस अंमलदार, हेमंत झुरुंगे, दिपक कांबळे, रविंद्र देवढे, विजय माने यांनी कारवाई केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०७ वी कारवाई आहे.
