सहकारनगर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पीएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृध्द नागरीक व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस शिताफीने अटक करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीसांनी ही कामगिरी केली.
चांदबाबु अली हुसेन शेख (वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. मुळ रा. गाव गौरव काला पोष्ट महमदपुर ता. कैरनलगड जि. गोंडा राज्य उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
फिर्यादी यांची जबरदस्तीने चोरलेली ४०,००० रुपये किमतीची सोन्याची बांगडी व एक १०० रुपये किमतीचे लॉखंडी कटर जप्त करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडून एकूण ६५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे.
फिर्यादी हया पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉप ते बालाजीनगर असा पीएमटी बसमध्ये बसुन प्रवास करीत होत्या. आहिल्यादेवी चौकात त्यांच्या हातातील २ तोळे वजनाची ४०,००० रुपये किमतीची सोन्याची बांगडी लोखंडी कटरच्या सहाय्याने जबरदस्तीने तोडुन चोरी करुन आरोपीने पळून नेले.
पीएमटी बसमध्ये चो-या करणारा मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेला व सध्या कोंढवा भागात राहणारा सराईत गुन्हेगार याला गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांनी पाठलाग करुन छत्रपती मंगलकार्यासमोर पकडले. सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणले.
गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन सुरेंद्र माळाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे व तपास पथकाच्या स्टाफने तपास सुरु केला. आरोपी चांदबाबु शेख याच्या अंगझडतीमध्ये त्याने त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेतली. त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने दोन ते आडीच महिन्यापुर्वी एक महिलेची पीएमटी बसमध्ये बालाजीनगर येथे पर्स चोरुन त्यामधील २५,००० रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स व २००० रुपये चोरल्याची माहिती दिली. त्यावरुन तपास करता सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे. त्याचे कोंढवा येथील राहते घरातुन २५,००० रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, अमोल पवार, निलेश शिवतरे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.
तसेच पोलीसांमार्फत महिला व वृध्द नागरीक यांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनीक बसमधुन प्रवास करताना सतर्कता बाळगुन काहीही संशयास्पद प्रकार आढळुन आल्यास पोलीस कंट्रोल रुम नंबर ११२ अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ यावर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.
