महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०२ येथे महाराष्ट्र पोलीस दलाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने गटामध्ये २ ते ८ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
०२ जानेवारी रोजी हर्ष फायर व परेड संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संचलनाची मानवंदना, समादेशक, रारापोबल गट क्र. २ पुणे, च्या नम्रता पाटोल यांनी स्वीकारली. त्यांनी वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन समादेशक सहाय्यक ईश्वर चौधरी यांनी केली.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा केला आहे.
