हडपसर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळीप्रमुख सुरज ऊर्फ चुस मोहीते व त्याच्या १५ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली.
आरोपी सुरज ऊर्फ चुस मोहीते, (वय-२२ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर) पाहिजे आरोपी अनिकेत पाटोळे, (वय-२३ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर) आदित्य पाटोळे, (वय-२० वर्षे, वैदवाडी, हडपसर), तुषार मोहिते, (वय-१९ वर्षे, वैदवाडी, हडपसर) नवनाथ ऊर्फ लखन मोहिते, (वय-१९ वर्षे, वैदवाडी, हडपसर), हासनेल शेनागो, (वय १९ वर्षे, वैदवाडी, हडपसर), गौरव झाटे, (वय-१९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर), ओ मकार देढे, (वय १९ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर), पंकज कांबळे, (वय-२० वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर) रविंद्र पाटोळे (वय-४६ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर), सचिन खंडाळे, (वय-२५ वर्ष, रा. वैदवाडी, हडपसर) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे, तसेच विधी संघर्षित ५ बालक हे ताब्यात असुन यातील काही पाहिजे आरोपी आहेत.
फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरात असताना परिसरात राहणारे अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे, लखन मोहिते, सुरज ऊर्फ चुस मोहिते, तुषार ऊर्फ बाळु मोहिते, सचिन खंडाळे, ओमकार देढे, पंकज कांबळे, गौरव झाटे, हसनेल अली शेनागो हे तोंडाला रुमाल बांधुन आले. हातात धारदार शस्त्र घेऊन त्यांच्या घराच्या बाहेर आले. यापुर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादीला शिवीगाळ करुन तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली. फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्राने वार केला. दगड मारुन जखमी केले. तसेच त्या भागातील दुकानातील काऊंटरच्या काचा, बाहेर पार्क केलेली दुचाकी व चारचाकी वाहने, लोखंडी हत्याराने मारुन, तोडुन नुकसान केले. लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत त्या भागात दहशत निर्माण केली म्हणुन त्यांच्याविरुध्द फिर्यादी यांनी हडपसर येथे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुरज ऊर्फ चुस मोहीते याने साथीदारासह दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब केला. स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व/ दहशत रहावी म्हणुन व स्वतःच्या व इतरांसाठी गैरवाजवी अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याविरूध्द बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दुखापत करणे असे गुन्हे दाखल असुन त्यांच्याविरुध्द प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्वीनी राख, ह्या करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग,रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहरचे आर, राजा, यांच्या मार्गर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदिप शिवले सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, हनुमंत झगडे गिरीश एकोर्गे, बाबासाहेब शिंदे, यांनी केलेली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०९ वी कारवाई आहे.
