परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
भुम : परंडा पोलीसांच्या पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय २६ वासरांची सुटका केली. या प्रकरणी वासरांची वाहतूक करणाऱ्यांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गोवंशाच्या कत्तलीवर राज्यात पुर्णपणे बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशाची तस्करी केली जाते. याला आळा घालण्यासाठी परंडा पोलीसांनी गोपनिय यंत्रणा सक्रिय केली होती. दि.३० डिसेंबर रोजी परंडा पोलीसांना गोवशांची अवैध वाहतूक रोखण्यात यश मिळाले आहे. परंडा पोलीसांनी वारदवाडी फाटा परंडा येथे सापळा लावला होता. यावेळी एक पिकअप जीप पकडली. त्यामध्ये एकूण २६ गोवंशीय जातीची वासरे आढळून आली. सदरील वासरे अत्यंत कोवळी असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहचवणे आवश्यक होते. जागेवरच पंचनामा करुन आणि पशु वैद्यकिय अधिकारी यांना घटनास्थळावर बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या भगवंत बहुउद्देशीय संस्था हाडोंग्री ता. भूम येथे गो शाळेमध्ये सोडण्यात आले आहे. पोलीसांच्या कारवाईने या लहान वासरांना नवीन आयुष्य लाभले आहे. पोलीयांनी या रेडमध्ये एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोना एन. पी. गुंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पॉलीस ठाणे परंडा येथे विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे हे करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोल- ीस अधिकारी गौरप्रसाद हिरेमठ, परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. इज्जपवार, सहा. पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार अर्चना भासले, पोलीस नाईक नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार योगेश यादव, भुजंग आडसुळ, वाहन चालक सचिन लेकुरवाळे यांच्या पथकाने केली.
