विमानतळ पोलीसांची कारागिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या राकेश ठोकळ या गुन्हेगारास केले जेरबंद करण्यास विमानतळ पोलीसांना यश आले आहे.
राकेश ठोकळ, (वय-२३ वर्ष, रा. खजुर वस्ती दर्याचे पाठीमागे, वैदुवाडी, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळ एकदेशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आले आहे.
विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार, शैलेश नाईक व सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, खराडी बायपास बसस्टॉपच्या शेजारी फुटपाथवर एक व्यक्ती थाबलेला असुन, त्याच्याकडे पिस्तूल सारखे हत्यार आहे.
ही माहिती तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन व इतर स्टाफ यांना कळविल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन येथे यापुर्वी ६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक, विजय चंदन हे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संगिता माळी, पोलीस अंमलदार, रुपेश पिसाळ, सचिनजाधव, सचिन कदम, अंकुश जोगदंडे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, शंकर वाघुले, विशाल निलख, राकेश चांदेकर यांच्या पथकाने केली आहे.
