चंदननगर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : रिक्षामध्ये गहाळ झालेले सोन्याचे दागिने तांत्रिक विश्लेषणव्दारे रिक्षा चालकाचा शोध घेऊन फिर्यादीस परत मिळवुन देण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे.
फिर्यादी महिला हया सणसवाडी, येथुन चंदननगर येथे येण्याकरीता रिक्षाने प्रवास करत होत्या. त्या मुंढवा खराडी बायपास रोडवर रिलायन्स मार्ट येथे उतरल्यानंतर तेथुन थोडे पुढे चालत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांचेकडील कपडे व सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्येच राहीली आहे. फिर्यादी हया परत रिलायन्स मार्ट चौक येथे आल्या असता,तो रिक्षाचालक हा निघुन गेला होता. त्यांनी रिक्षाचा आजुबाजुस शोध घेतला. परंतु रिक्षा मिळुन आली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकाराबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस अंमलदार, आव्हाड, कोद्रे व सैय्यद यांना सांगितले. त्यांनी तात्काळ रिलायन्स मार्ट चौक व आजुबाजुचे रिक्षाचा नंबर प्राप्त करुन, या नंबरच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार तांत्रिक विश्लेषणावरुन रिक्षा चालक याचा शोध घेऊन, त्याच्याकडील फिर्यादी महिला यांची कपड्याची बॅग व सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत मिळवुन दिले आहे. याबाबत फिर्यादी यांनी पोलीसांचे आभार मानले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परि-४, शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मनिषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, प्रशांत माने व पोलीस अंमलदार, सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ, महेश नानेकर, विकास कदम यांनी केलेली आहे.
