• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

January 8, 2024
0
08 01 24 013
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पिंपरी-चिंचवड : प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे.  आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  कडे संवेदनशिलता नाही. कितीही  आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  मानवी संवेदना देवू शकणार नाही. मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम आहे. ती टिकवावी लागेल. शाश्वत मूल्य लक्षात घेवून २१ व्या शतकातील मूल्य ओळखावी लागतील.  ओटीटी च्या काळात देखील नाटक संपलेलले नाही. जोवर मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळा रविवारी चिंचवड येथे पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद), नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पिंपरी चिंचवड महपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, कैलास कदम, शंकर जगताप, सचिन भोसले, धम्मराज साळवे, तुषार कामटे, सचिन चिखले, निलेश तरस, चेतन बेंद्रे, राजेंद्र मुथा, स्वप्नील कांबळे, चंद्रकांत लोढे, राजेंद्र जैन, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील, धारिवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रकाश धारिवाल आणि नाट्य परिषद नियमाक मंडळाचे पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पिंपरी – चिंचवड शहरातील २५ दिग्गजांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी सोलापूर नाट्य परिषदेकडे मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि घंटा सुपूर्द करण्यात आली.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाला केशराचं शेत म्हटले होते, मला वाटते शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं, केशरी रंग आम्हाला प्रिय आहे. सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे, राज्याचा अमृतकाळ लवकरच सुरू होईल त्या काळात नाट्य क्षेत्र नक्की कुठे असेल याची कल्पना आम्हाला येणार नाही, मात्र तुम्ही नाट्य क्षेत्रातील लोकांनी आम्हाला सांगा नेमके व्हीजन काय असावे? ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रात बदल व्हावा, विकास व्हावा हा संकल्प घेऊन आम्ही इथे आलो आहोत. मराठी नाटकांवर आज काहीसे सावट असले तरी ते निश्चित दूर होईल यात शंका नाही. मराठी नाटक फक्त मनोरंजन करत नाही तर जगण्याची दिशा देते. तसेच डॉ. जब्बार पटेल यांनी बिनविरोध कसे निवडून यायचे हे सांगावे मी मंत्रालयातून फाइल्स कशा क्लियर करायच्या याचे गुपित सांगतो असे सांगत नाट्य क्षेत्राच्या, नाट्य गृहाचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सत्ता सोडणार नाही अशी मिश्किल टिपणी केली.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, लहान मुलांमध्ये संवेदनशीलता, आकलन क्षमता जास्त असते त्यांना शाळेत कला विषय ज्ञान देण्याची गरज आहे, कारण आजची बालके मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. पुढे जाऊन त्यांना वाद्य, कला याचे ज्ञान मिळेल आणि ते प्रगल्भ होतील. तसेच नाट्य संमेलनात मल्याळम, कन्नड आणि बंगाली रंगभूमी वरील काही कार्यक्रम आणि विदेशातील फ्रेंच व जर्मन रंगभूमीची भारतीयांना ओळख करून द्यावी अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यकर्त्या कडून नाट्य क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यास उशीर होतो, मंत्रालयात फाइल्स पुढे सरकत नाहीत, त्या विलंबित तालात फिरतात त्याला द्रुत लयीत फिरवण्याची गरज असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उत्तम कलाकार, उत्तम नाटक करतात. पण त्यांचे कार्यक्षेत्र जास्त आहे. ते रंगकर्मी असल्याने आम्ही त्यांना हक्काने काही मागू शकतो, असे म्हणत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, नाट्यगृहांचे जे व्यवस्थापक नेमले जातात. ते वेगवगेळया विभागातून आलेले असतात . त्यांना नक्की तेथे काय काम अपेक्षित आहे हे बहुदा माहीत नसते. त्यामुळे जे जेष्ठ कलाकार आहेत. त्यांना नाट्यगृहांचे उपव्यवस्थापक म्हणून नेमण्यात यावे; तसेच नाट्यगृह बांधताना शासनाच्या समितीत एक जेष्ठ कलाकार असावा, अशी मागणी दामले यांनी प्रशासनाकडे केली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आज या समारंभात उपस्थित राहता आल्याचा अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्य परिषद यांचंही नातं खूप जुने आहे. एकमेकांना पूरक असं काम या दोन संस्था करत आल्या आहेत. पूर्वी अनेक मान्यवरांनी नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवलेले आहे. साहित्य संमेलन मराठी समाजाचा साहित्यिक उत्सव आहे. पूर्वीपासून कला – साहित्य निर्मितीचे केंद्र पुणे मुंबईत होते मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील लेखक लिहायला लागलेले आहेत. तेच नाटकाच्या बाबतीतही घडत आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय विचार नाट्यांची परंपरा मराठीत पुरेशी विकसित झालेली नाही. ज्याप्रमाणे मराठी साहित्य विश्व राष्ट्रीय विषयावरील कसदार कादंबरीच्या प्रतिक्षेत आहे त्याच प्रमाणे राजकीय विचारनाट्याच्या प्रतीक्षेत सध्याची मराठी रंगभूमी आहे. राजकारणी मंडळी ही अचंबित होतिल असे कुटील राजकारण सध्याला स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे आणि साहित्यिक म्हणून घेणारे मान्यवर पडद्याआडून करत असतात. कलावंताची कला कशी असावी याचा निर्णय जेव्हा समाजातील झुंडी घ्यायला लागतात तेव्हा ती कलेच्या ऱ्हास पर्वाची सुरुवात असते. या झुंडींचा बंदोबस्त शासनाने करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, मोरया गोसावींची ही भूमी आहे. २७ वर्ष काम केल्याचे १०० वे नाट्य संमेलन हे फळ आहे. पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे पण पिंपरीला उप सांस्कृतिक राजधानी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सर्वांच्या मदतीने हे नाट्य संमेलन यशस्वी झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन नरेश गडेकर यांनी मानले.
वृद्धाश्रमासाठी राज्यसरकार मदत करणार ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे जमीन दिली आहे. त्या जमिनीवर वृद्धाश्रम करावे अशी मागणी परिषदेच्यावतीने सरकारला करण्यात आली. यावर आज बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘जेष्ठ कलाकारांचा आराखडा तयार करा, शासन त्या उपक्रमांसाठी मदत करेल’, असे आश्वासन दिले.

08 01 23 13
Download

Latest Articles

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
Load More
Previous Post

हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमली बालनगरी

Next Post

दर दिवसाला 100 कोटींचा ऑनलाइन व्यवहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

February 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta