चंदननगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर चंदननगर पोलिसांनी कारवाई केली.
सैफ वाजीद अली खान (वय २६ वर्षे, बालाजी नगर, गुरुव्दाराचे शेजारी, वडगावशेरी) व एक अल्पवयीन मुलगा (वय १७ वर्षे, रा. वडगावशेरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्या ताब्यातुन ४५,६०० रुपये किमातीचा नायलॉन मांज्या जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविण्यात येत होते. कोंबींग ऑपरेशन दरम्यान चायनीज नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस स्टेशन हद्दीत कोंबींग ऑपरेशन करीत असताना, पोलिस अमंलदार तुषार आल्हाट व सुहास निगडे यांना माहिती मिळाली की, बालाजी नगरकडे जाणाऱ्या रोडवर, बालाजी नगर, वडगावशेरी, पुणे येथे नवीन बांधकाम चालु असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन व्यक्ती बंदी असलेला पतंग उडविण्याचा प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजा विक्री करीत आहे. त्यानुसार वरील स्टाफने या ठिकाणी छापा घातला असता,तेथे आरोपी हे त्यांच्या जवळील पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये पतंग उडविण्याचा प्रतिबंधीत नायलॉन मांज्याचे रिळ (गड्डु) विक्री करीत असताना मिळुन आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, शशिकांत बोराटे, सहायक. पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांच्या कार्यालयातील गणेश कवितके, पोलिस अमंलदार निलेश शिर्के, गणेश डोंगरे व चंदननगर पोलीस स्टेशन कडील सहायक पोलिस निरीक्षक निलेश घोरपडे, पोलीस अमंलदार सचिन कळसाईत, पंकज मुसळे, अशोक थोरात, श्रीरामे यांनी केलेली आहे.
