आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भुम तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 13, 2024
Spread the love

भूम: येथील तहसील कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक बिंदु माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार सचिन खाडे हे होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष अजित बागडे यांना ग्राहक दिनाचे औचित्य साधून स्व अरुण भार्गवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रतिवर्षी छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी दिला जातो. हा पुरस्कार तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित बागडे, दिनेश बहिरमल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष बाबर, नायब तहसीलदार मनोरमा गाडे, हरिश्चंद्र पवार, मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल, यांच्यासह तक्रारदार, ग्राहक, दुकानदार हजर होते. सूत्रसंचलन आशिष बाबर यांनी केले.