आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तोफेची सलामी देऊन भुम येथे जिजाऊंना अभिवादन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 13, 2024
Spread the love

भूम : येथील तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमीत्त तोफेची सलामी शहरातील नागोबा चौकात देऊन फेरीस प्रारंभ करण्यात आला.

तुळजाई दुर्गा प्रतिष्ठान मागील १५ वर्षापासून जिजाऊ जयंती शहरात विविध उपक्रमाने साजरी करीत असून यावर्षी देखील त्यांनी शहरासह तालुक्यातील शाळेत जाऊन जिजाऊ व गड किल्ले याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिजाऊ जयंतीनिमित्त नागोबा चौक येथून जिजाऊंच्या प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौक, आठवडी बाजार, गोलाई, ओंकार चौक, येथून नागोबा चौक येथे आल्यानंतर फेरीचा समारोप करण्यात आला. मूकबधिर शाळेमध्ये विविध खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. तालुक्यातील गोरमाळा येथील तेजस औताडे या युवकांनी केवळ वीस दिवसात ही तोफ बनवली असून, या तोफेचे प्रात्यक्षिक देखील जिजाऊ जयंतीनिमित्त उपस्थित नागरिकांना सादर करण्यात आले. हि तोफ छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी पुरंदर किल्ल्यावर भेट म्हणून ठेवण्यात येणार आहे. तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्यावतीने आजवर ४० किल्ल्यांना दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यावेळी विठ्ठल बाराते, तानाजी सुपेकर, अनिकेत आकरे, शुभम पवार, तेजस औताडे, अभी सुरवसे, गणेश भोळे, ऋतुराज खानवीलकर, ओमकार पवार, रुपेश औताडे, प्रदीप औताडे, निलेश औताडे, प्रवीण औताडे, किशोर औताडे, शंकर औताडे, सुजित जिकरे, प्रशांत गवळी, हर्षद रेवडकर, शुभम शिंदे अतुल वारे यांच्यासह तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूमचे सभासद उपस्थित होते.