आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीगचे उत्साहात उद्घाटन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 15, 2024
Spread the love

पुणे: मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या पर्वाची ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य प्रायोजक गौरव दुगड, सहप्रायोजक आशिष शहा, मार्केट यार्ड पोलिस सुरेश सिंग गौड, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिरुध्द भोसले आणि जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे अचल जैन उपस्थित होते. या स्पर्धेत १६ संघाद्वारे २०८ युवा व्यापारी खेळाडू आपले कौशल्य पणास लावणार आहेत. यावेळी मार्केट यार्ड येथील व्यापारी आणि त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यापारी सुद्धा खेळाप्रती जागरूक राहून मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करू शकतात हे पाहून चंदू बोर्डे यांनी आयोजकांचे कौतुक केले. मुकेश गोयल, कुणाल ओस्तवाल, सुदर्शन भंडारी, कमलेश गोयल,जतीन शहा आणि सचिन रायसोनी या युवा व्यापाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीगची स्थापना केली आहे.