आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अपघात करून पळ काढणाऱ्या आरोपीला शिताफीने पकडले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 15, 2024
Spread the love

पुणे: फेटल अपघात करून पळ काढणाऱ्या आरोपी वाहन चालकाला युनिट ४ ने ताब्यात घेतले आहे.

धनाजी रूपनर (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यास अपघातातील वाहनासह ताब्यात घेण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. अपघाताच्या घटनास्थळी तांत्रिक माहितीनुसार अपघात करुन पळून जाणाऱ्या बिएमडब्लू कंपनीच्या वाहनाचा क्रमांक व मालकाचे नाव निष्पन्न करण्यात आले. या वाहन चालकावर आधीही गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस वैद्यकीय तपासणी करून अपघातातील वाहनासह पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 4 चे पोलीस उप निरीक्षक पाटील, पोलीस हवालदार मोरे, साळवी या पथकाने केलेली आहे.