सिंहगड रोड पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणा-या प्रणव कुंभार या आरोपीकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीसांनी ही कारवाई केली आहे. प्रणव कुंभार (वय १९ वर्षे रा. राजरत्न अपार्टमेंट बेनकर वस्ती चव्हाण शाळेजवळ धायरी) असे आरोपीचे नाव आहे.
त्याची अंगझडती घेता त्याच्या कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये एक ४५,००० रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टच्या खिश्यात ५०० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकुण ४५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बींग ऑपरेशनादरम्यान रेकॉर्ड वरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, खंडोजी चव्हाण शाळेच्या पाठीमागे, मोकळया मैदानात, धायरी येथे एक व्यक्ती जवळ एक गावठी पिस्टल घेऊन थांबलेला आहे. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे यांना कळविली. वरिष्ठांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले
सचिन निकम यांनी सोबतच्या स्टाफसह खंडोजी बंडोजी चव्हाण शाळाचे पाठीमागे, नंदीबावरा मित्र मंडळाचे जवळ, मोकळया मैदानात, धायरी येथे येऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे ती व्यक्ती त्याच ठिकाणी उभा असल्याचे दिसले. त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला स्टाफच्या मदतीने काही अंतरावर पकडले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी हे करीत आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक गणेश मोकाक्षी, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास बांदल, विकास पांडुळे, दक्ष पाटील यांच्या पथकाने केली.
