महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन सम्मेद तरटे यांची पोलीस जाणीव सेवा संघाच्या बार्शी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. पोलीस जाणीव सेवा संघ हा सदैव पोलीस बांधवांना मदत करत असतो.तसेच प्रत्येक जयंती असो अथवा कुठलाही बंदोबस्त असो या ठिकाणीपोलिसांच्या सूचनेनुसार पोलीस जाणीव सेवा संघ आग्रेसर असते. तसेच अपंग व्यक्तींना शाळेतील मुलांना मदत करण्याचे कार्य तसेच सामान्य नागरिकांची मदत करण्याचे पण कार्य करत असते.अशा पद्धतीने पोलीस जाणीव सेवा संघ सर्वत्र कार्य करत असतो. ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तरटे यांनी संघाचे ध्येय व धोरण जोपासून प्रयत्न करावा असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा निर्णय सर्वांनु मते घेण्यात आला. तसेच यावेळी बार्शी शहर अध्यक्षा कौशल्याताई राऊत,उपाध्यक्षा भाग्यश्रीताई बोंडवे, राजगोपाल मालू तसेच तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.