आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चेन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला अटक

Spread the love

४ गुन्हयांमध्ये होता फरार

पुणे : चैन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला व ४ गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलीसांनी शिताफीने अटक केली.

सागर शर्मा ऊर्फे भोवते, (वय २० वर्षे, रा. एस.आर.ए, बिल्डींग, ए विंग, ७ वा मजला, लेक टाऊन) व त्याचे साथीदार अमोल आडम, (वय २४ वर्षे, रा. प्रथमेश अपार्टमेंन्ट, फ्लॅट नंबर १२, चौथा मजला, राम मंदीराचे मागे, शंकरनगर, जैन मंदीर, कात्रज) प्रथमेश ऊर्फे पिल्या ठुमके, (रा. घोटी, इगतपुरी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन २३.३१० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत. सकाळी ७.०० च्या सुमारास फिर्यादी वैशाली गलगली, (रा. ४०१ पार्क लॅन्ड पार्क, लेकटाऊन रोड, बिबवेवाडी, पुणे हे गेट नंबर २, पार्क लँन्डमार्क सोसायटी, लेकटाऊन रोड, बिबवेवाडी), तसेच सह फिर्यादी मोहन शिवथरे, (रा. कात्रज) हे सकाळी ७.१० च्या सुमारास कात्रज तळे, ते वरखडेनगरकडे जाणाऱ्या रोडवरील लेक साईट नावाच्या सोसायटी समोरील रोडवरुन पायी चालत जात होते. तेंव्हा दुचाकी गाडीवरुन आलेल्या दोन व्यक्तींपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळयातील ११.३१० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व सह फिर्यादी यांच्या गळयातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन चोरी केली आहे. फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. वरील आरोपींनी गुन्हयाच्या तपासामध्ये गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामध्ये सागर शर्मा ऊर्फे भोवते याला अटक करुन त्यातील पाहीजे आरोपी अमोल आडम याचा शोध पोलीस घेत होते. हा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना तो कात्रज, जैन मंदीराजवळ थांबला आहे अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज जैन मंदीर येथे जाऊन पाहता तेथे आरोपी मिळुन आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.