मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना सापडताच त्याला अटक करण्यात आली आहे.
मार्केटयार्ड पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.
दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान, (वय ३४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या जवळ ४.६१० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण १३,००० रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आला. मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच तपास पथकातील कांबळे पोलिस अमंलदार यांच्यासह खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत चालत होते. चालत चालत गल्ली नं. १४, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड येथे ते आले असता, सार्वजनिक शौचालय भिंतीच्या आड एक व्यक्ती संशयास्पदरित्या बसलेला दिसून आला. हा व्यक्ती अंधारात का बसलेला आहे हे पाहण्याकरीता त्याच्या जवळ जात असतांना तो रेकॉर्डवरील आरोपी दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान असल्याचे दिसला. तो पोलिसांना पाहुन पळून जात असतांना थोडयाच अंतरावर पकडुन त्यास तु का पळून जात होतास असे विचारले असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतरकांबळे यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता, तो या ठिकाणी एम.डी. हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे त्याने सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याने गुन्हा कबुल केला. त्याच्यावर मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास कांबळे करीत आहेत. ही कारवाई, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहुराव साळवे, यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने तपास पथकाचे मदन कांबळे, थोरात, हिरवाळे, पोटे, जाधव, अंमलदार झायटे, यादव, तायडे यांनी केली आहे.
