जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी, 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावं, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने 6 हजार 473 प्रगणक तर 458 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. हे प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगणक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तालुका निहाय प्रगणक व पर्यवेक्षक यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. उत्तर सोलापूर (231,16), बार्शी (921.56), दक्षिण सोलापूर (344,24), अक्कलकोट (582,39), पंढरपूर (1150,74), मोहोळ (525,37), माढा (698,51), करमाळा (500,34), मंगळवेढा (499,42), सांगोला (450,32) व माळशिरस (573,53).