महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: येरवडा पोलीस स्टेशनने टोळी प्रमुख प्रथमेश ऊर्फ गोट्या सुर्यवंशी व त्याच्या साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली.
प्रथमेश ऊर्फ गोट्या सुर्यवंशी (वय २४ वर्षे रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे) आकाश कानडे (वय २७ वर्षे, रा.शनि आळी, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी यांनी पुर्वीच्या वादाच्या कारणांतुन आपसांत संगनमत करुन, हातामध्ये लोखंडी हत्यारे घेऊन येऊन परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यात व मानेवर वार करुन डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेतला. परिसरात दहशत करुन तु बचके रहना अशी धमकी दिली. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टोळी प्रमुख प्रथमेश ऊर्फ गोट्या सुर्यवंशी याने वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने परिसरात खुनाचे प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारानिशी दंगल माजवणे, गंभीर दुखापती करणे, तडीपार असतानाही प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करुन टोळीच्या मदतीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर प्राणघातक हत्यारे सतत जवळ बाळगुन परिसरात दहशत माजवणे तसेच जिवे ठार मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याने येरवडा परीसरात दहशत निर्माण करून, स्वतःसाठी व इतरांसाठी आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने तसेच परिसरात त्याच्या टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन, नागरीकांच्या मनात भिती व दहशत निर्माण करुन गंभीर गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटीतपणे, दहशतीच्या मार्गाने, बेकायदेशिरपणे स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे स्पष्टपणे दिसुन आले. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त, (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही ११५ वी कारवाई आहे.
