लोणीकंद पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: टोळी प्रमुख ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली. ईस्माईल शेरेकर, (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर येरवडा) कुणाल ऊर्फ राजा जाधव, (रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास) सुदेश ऊर्फ बाब्या गायकवाड, (रा. बाराते वस्ती, सुभाषनगर येरवडा) राहुल घाडगे ऊर्फ आर.डी.जी. (रा.येरवडा) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते सराईत गुन्हेगार असुन पाहिजे आरोपी आहेत. फिर्यादी यांचा मुलगा हा त्याच्या मित्रांसह वाघोली लोहगांव रोडवरील हॉटेल २४ क्लब हाऊसच्या बाहेर बोलत उभा होता. यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ईस्माईल शेरीकर, कुणाल जाधव ऊर्फ राजा घाडगे ऊर्फ आर.डी.जी. व सुदेश गायकवाड यांनी फिर्यादीच्या मुलाजवळ येऊन, तु अंश पुंडे याच्याबरोबर का राहतो, तुला खुप माज आला काय, तु खुप मोठा भाई झाला का असे बोलुन, अंश पुंडे याच्याबरोबर असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून चिडुन जाऊन, त्याला शिवीगाळ व दमदाटी केली. लाथा- बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. फिर्यादी यांच्या मुलास गंभीर दुखापत केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पाहिजे आरोपी ईस्माईल शेरेकर याने त्याच्यासह अन्य सदस्यांसाठी आपल्या अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नविन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार केली. गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांच्यावर येरवडा पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन येथे खुन, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करुन दरोडा, गंभीर दुखापत, चोरी, बेकायदेशीर जमाव जमवीने, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने व इतर फायदयासाठी बेकायदेशीर मार्गाने गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हिंसक मार्गाचा अवलंब केला. जनमाणसात दहशत पसरविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. आरोपी यांनी संघटितपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने व इतर फायदयासाठी गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील हे करीत आहे. ही कामगीरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ०४, विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सीमा ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप-निरीक्षक, राहुल कोळपे, रामकृष्ण दळवी व सव्हॅलन्स पथकातील पोलीस अंमलदार, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर १६ डिसेंबर ते ३१ जानेवारी रोजीपर्यंतचे कार्यकाळात १०३ दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. तसेच ११७ गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
